“उत्सवप्रियःखलु मनुष्यः”
असे महकवी कालिदास यांनीम्हटले आहे आणि ते
शंभर टक्के बरोबर आहे. माणूस हा खरोखर उत्सवप्रिय आहे. त्यामुळेचभारतीय संस्कृतित
सण आणि अत्सवांना विशेष महत्व आहे. सण असो किंवा कोणताही समारंभ असो,
त्यात सर्वजण उत्साहने सहभागी होतात.सण,
उत्सव, व्रते,समरंभ या स्वरुपात आप्ल्यालाथोर दिर्घकालीन
वारसा लाभला आहे.हा वरसा जोपासलाआहे, विषेश म्हणजे भारतीयसंस्कृति ही आजपर्यत टिकून आहे,
त्याचे सर्वात जास्तश्रेययेथील सण आणि उत्सवांनाच आहे.कारणप्रत्येक सण हा या
देशाच्या वेगवेगळ्या संस्कृतिचे प्रतिक आहे. प्रत्येक सणात आपल्या संस्कृतिचे
प्रतिकदिसते.
सातशे वर्षापूर्वी महरष्ट्रात देवगिरीच्यायादव रजाची सत्ता होती.यादवांच्या
मुत्सद्दी कारभारी,थोर,स्थापत्यशास्र्,
मोडी लिपीचा प्रवर्तक, हेमांद्री तथा हेमांडपत याने त्यावेळी ‘चतुवर्गचिंतामाणी’
नावाचा एक ग्रंथ पाच खंडातून लिहीला. वर्षतीलतीनशे पासष्ट दिवसात कोणते सण साजरे
करावेत,
कोणत्याव्रतांचे पालन
करावे,
हे सांगणाराग्रंथ लिहिला. यावरून त्यावेळच्या समाजजीवनाचे दर्शन घडते. तसेच मणसामणसांच्या
एकत्र येण्यातूनच सण-उत्सवांची निर्मिती झाली अणि आज ते आपल्या भाषेचे,संस्कृतिचे,
धर्मभावनेचे अविभाज्यघटक बनले आहेत. हे सण सजरे करण्यामागे
शैक्षणिक,
धर्मिक,सांस्कृतिक, सामाजीक आसे अनेक कारणेआहेत,
पण त्याचप्रमाणे व्यापक असा समाजरचनेचा घटक म्हणजे कुटुंब
यासाठीही सणांनामोठ्या प्रमाणात महत्व असते.लोकाना एकत्र
आणण्यासाठी हे सण महत्वाचा रोल निभावतात. पूर्वीदळणवळणाच्या साधने उपलब्ध नव्हती
त्यावेळीएकमेकांना भेटण्यासाठी किंवा मुलींनामाहेरी जाण्यासठी हे एक कारण असे.सर्वजण
एकत्रयेवून गोडधोड बनवत.सणांच्या निमित्तानेघरात अनेक पदार्थ बनवले जातात. या
सर्वामागेपरंपरा आणि मानवी मुल्ये आहेत. व्यक्तीआणि समाजाचे न तुटणारे नाते आहे. हे सबंधअधिक दृढ व्हावेत यासाठी सण हातभारलावतात. माणसामाणसांना सर्व प्रकारचे भेद
विसरूनबंधुभाव व राष्ट्रीय एकात्मता साध्याकरण्यासाठी,सामाजीक अभिसरणासाठ, विचार-अनुभवाचीदेवाणघेवाण करण्यासाठी सण-उत्सवाचाउपयोग होतो.सुखी व समृध्द जीवनासाठी
सुयोग्य संस्काराची गरज आहे.अशा सुसंस्काराच्याअखंड वाहणा-या प्रवाहात आपला जन्म
होतो.आपण साजरे करतो ते सण आणि उत्सव हा त्या प्रवाहाचाच दृश्यआविष्कार आहे.
भारत हा विविधतेने नटलेला आहे वेगवेगळेपंथ,धर्म,जात,भाषा,
विचारही वगवेगळे आहे.त्यामुळे भारतीय संस्कृती जरी एकात्मअसली तरी येथील सण- उत्सव साजरे
करण्यातही विविधताआहे. एकच सण अनेक ठीकाणी वेगवेगळ्यापध्द्तीने साजरा केला जातो. उदा- मकर
संक्राती ही लोहाडी,लोहळी,
संक्राती,पतगाणू, तहेबार,पोगलआदी नावानी वेगवेगळ्या भागात ओळखला जातो.भारतात असंख्य सण साजरे केले जातात.त्यांची सख्या सागणे कठीण आहे. तसेच
महाराष्ट्रातहीअनेक सण साजरे होतात. त्यात गुढीपाडवाहा नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. तसेचदसरा,दिवाळी,नवरात्र,नारळीपोर्णिमा,गणपती,होळी असे मोठे सण सर्व ठीकाणी साजरे होतात.
👍👍👍👍👍👍
ReplyDelete