Thursday 6 February 2014

गुढीपाडवा


 







            गुढीपाडवा हा सण मराठी नवीन वर्षाची सुरवात म्हणुन साजरा केला जातो. भारतातील बहुसंख्ज्य लोक हा सण मोठ्या अनंदाने साजरा करतात. श्रीमंत असो किंवा गरीब सर्वजण या दिवशी आपल्या घरावर गुढी चढवतात, हि गुढी म्हणजे एक सरळ उंच वेताची किंवा साधी काठी घेउनत्याच्या वरच्या टोकाला चांदिचे,तांब्याचे, किंवा वेताची काठी किंवा पितळी भांडे पालथे घालुन बांधतात. एक रेशमी वस्त्र किंवा चोखळण, त्याच्यावर कडुलिंबाची डहाळी आणि साखरेच्या गाठीची किंवा खोब-याच्या वाटीची माळ घालतात याला गुढी म्हटले जाते. गुढीला गंधफुले वाहून पूजा करतात आणि गुळ खोब-याचा नैवेद्य दाखवितात. तसेच लोक सुगंधी द्रव्य लावून मंगलस्नान करतात. कडुलिंबाची पाने,मिरे, हिम्ग, साखर,जिरे, ओवा,चिंच यासह बारीक करून खातात. कडुलिंब ओषधी असल्याने अनेक प्रकारचे आजार दुर होतात म्हणुन या वनस्पतीला महत्वाचे मानले जाते. या पदार्थामुळे,आपल्याला उत्तम, अरोग्य लाभते.बुध्दी तेजस्वी होते. तसेच या दिवशी मंदिरात कडूलिंब- सखरेचे मिश्रित पणि प्रसाद म्ह्णुन दिले जाते. त्याचा अर्थ असा की सुख किंवा दुःख कधीही एकटे येत नाही. त्यामुळे या सर्वांना सामोरे जण्याची भावना निर्माण व्हावी असे असते. अशी यामागची प्रेरणा आहे. घरात पुरणपोळ्या किंवा गोड पदार्थ बनविले जातात. नव्या वर्षातील पहीला दिवस म्हणुन लोक या दिवशी गुढीबरोबर नव्या कामाची सुरूवात करतात. तसेच पंचांग आणुन त्याची पुजा करतात. मराठी वर्षात एकुण साडेतीन शुभमुहुर्ताची माहिती मिळते. त्यापैकी एक मुहुर्त हा आहे. 
          शिशिरऋतूबरोबर कडाक्याची संपते.त्यानंतर वसंत ऋतुचे आगमन होते.चैत्र महिन्यात नव्या मराठी वर्षाची सुरुवात होते. वर्षाची सुरुवात म्हणुन हा दिवस साजरा होतो.नव्या वर्षाची सुरूवात सुखाने साजरी केली, पुर्ण वर्ष सुखात जाते, अशी भावना आहे. हा दिवस चैत्र शुध्द प्रतिपदा असे म्हणतात. या दिवसाचे  अनेक करणांमुळे महत्व आहे. त्यात अनेक कथा प्रचलित आहे. त्यात एक म्हणजे खुप वर्षांपूर्वी माहाराष्ट्राची रजधानी पैठण ही होती. प्रतिष्ठानपूर हे ही एक नाव पैठण्ला होते. तेथील राजाचे नाव शालीवाहन होते. तो अतिशय  परक्रमी, न्यायी आणि शूर होता.याच काळात राजा शक आणि त्याचे सैन्य अनेकएळा स्वारी करत असत. जनतेची लूट, अत्याचार हे प्रकार अनेकदा झाले.त्यामुळे शक राजावर शानिवाहनाने स्वारी केली व त्याचा पराभव केला. त्यामुळे लोकांचे हाल कमी झाले.लोकांना आनंद झाला.त्याचा हा विजयदिन म्हणजे चैत्र पडव्याचा दिवस. या दिवसापासून शालिवाहन वर्षाची सुरुवात झाली.
     रामायणातील एक कथा म्हणजे प्रभू रामचंद्र, लक्षमणआणि सीता यांनी चौदा वर्ष वनवासात काढली.केवळ वडीलबंधूंशी प्रेमळ आज्ञा म्हणुन भरत आयोध्येची राज्य चालवीत होता. तो श्रीरामचंद्रांच्या येण्याचीच वाट पाहात होता. चौदा वर्ष पूर्ण झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाही तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे ठरवले.दुस-या दिवशी भरत पहाटे उठला. त्याने रामचंद्रांच्या पादुकाम्ची पूजा केली.आणि तो चितेकडे निघाला. त्यावेळी महाबली हणुमान पुढे आले.आणि त्यांनी रामचंद्र येत असल्याची वरदी दीली. ही बातमी ऐकून त्याने शत्रुघ्नला अयोध्या नगरी सजवायला सांगीतली.आणि रामचंद्रांच्या स्वागताची तयारी केली.नंदीग्रामपासुन आयोध्या नगरी पर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याक्चा सडा टाकला. शंख, शिंगे भेरी, झांजा यांच्या झंकार वजू लागले.लोकांनी घरावर स्वागतासाठीगुढ्या उभारल्या.तोरणे  बांधली. आणि आपला आनंद व्यक्त केला. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली, असे म्हटले जाते.




No comments:

Post a Comment