श्रावण वद्य अष्टमीचा दिवस हा भगवान
श्रीकृष्णाचा जन्मदिवस होय. तोच दिवस गोकुळ अष्टमी म्हणून साजरा करतात.
श्रीकृष्ण हा विष्णूचाच अवतार श्रीकृष्ण किंवा विष्णूच्या मंदिरात
हा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. हीच श्रीकृष्ण जयंती होय. श्रीकृष्णाचा
जन्म गोकुळात झाला म्हणून त्याला गोकुळ अष्टमी असे म्हणतात. श्रीकृष्ण
श्रावण वद्य अष्टमीस तुरूंगाच्या कोठडीत जन्मास आले, अशी कथा प्राचीन
ग्रंथांत आहे.
मथुरेचा
राजा उग्रसेन त्याचा मुलगा कंस याने तुरुंगात टाकले. आणि त्याचे राज्य हस्तगत
केले. आपल्या
चैनीसाठी कंसाने प्रजेवर अन्याय-अत्याचार केले. त्याच्या बहीणीचे लग्न झाले. वरातीचा
रथ वसुदेवाच्या घरी जात असताना आकाशवाणी झाली की, ‘दुष्ट कंस, ज्या बहीणीला तू
मोठ्या प्रेमाने सासरी पाठवत आहेस, तिचा आठवा पुत्र तुझा वध करणार आहे.’ हे ऐकून कंस
देवकीला माराण्यासाठी गेला पण वसुदेवाने त्याची समजूत घातली आणि त्याने वचन दिले
की, देवकीला होणारी मुले मी तुझ्या स्वधीन करेल.त्यमुळे त्यांना कारागृहात टाकले. त्या
दोघांवर सक्त पहारा ठेवला. देवकीची सात मुले कंसाने मारली होती. श्रावण वद्य
अष्टमीला मध्यरात्री
श्रीकृष्णाचा जन्म झाला. बंदीशाळेतील सर्व पहारेकरी झोपले असताना वसुदेव त्या बाळाला
यमुना नदी ओलांडून नंदाच्या घरी गेले. ते बाळ नंदाच्या घरी ठेवले आणि यशोदेच्या मुलीला
घेऊन परत कारागृहात आले.

भारतात
गोकुळ, मथुरा, वृंदावन, व्दारकाया ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला
जातो. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट इथे हा सण साजरा
केला जातो.
No comments:
Post a Comment