Thursday 6 February 2014

बैलपोळा


भारत हा शेती प्रधान देश आहे. इथली बहुतांशी लोक खेड्यात राहतात.शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.इथले जीवन शेतीवरच अवलंबून आहे.या शेती कामात बैलांची मोठ्या प्रमाणात मदत होते.या बैलांच्या म्दातीन्या शेतकरी उन्हात शेताला पाया घालून ठेवतो. नांगरणी-वरकाणीची कामे तो आटोपतो. त्यानंतर जून महिन्यात मृग नक्षत्राची आणि पावसाची सुरवात होते.सलग पेरणी आणि त्या पाठोपाठ कोळपणी-पाभारणी सुरु होते.त्या नंतर पावसाला सुरवात झाल्याने बैलांना अपोआपच विसवा मिळतो.त्यानंतर सणांनी गजबजलेला श्रावण महिना सुरु होतो.या महिन्यातील आमोस्याला बैल पोळा हा सन असतो.कर्नाटक,महराष्ट्रात त्यला बैल पोळा म्हणतात.दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर किवा बेंडर म्हणतात. कर्नाटकाच्या काही भागात कार्हुनावी म्हणतात. आषाढ,श्रावण, किंवा भाद्रपद या महिन्यात हा सण प्रदेश्परत्वे वेगवेगळ्या वेळी साजरा करण्याची पद्धत आहे.

बैल पोळा हा सण साजरा करण्याची कथा अशी आहे कि कैलासावर शंकर-पार्वती सारीपट खेळत होते. त्या वेळी पर्वतीने डाव जिंकला.पण शंकर देव म्हणाले कि डाव मि जिंकला त्यावरून दोघांत वाद सुरु झाला.याला साक्षी फक्त नांदी होता.तेव्हा पार्वतीने विचारले कि डाव कुणी जिंकला? त्या वेळी नंदिन्ये शंकराची बाजू घेतली तेव्हा पर्वतीने नंदीला शाप दिला म्रृत्युलोकी तुज्या मानेवर जू बसेल. तुला जन्मभर कष्ट करावे लागेल.हा शाप आयकून नंदीला त्याची चूक समजली त्याने पार्वतीला माफी मागितली. तेव्हा पर्वतीने उ:शाप दिला शेतकरी वर्षातून एक दिवस देव मानून तुझी पूजा करतील.त्यादिवशी तुज्या मानेव जू ठेवणार नाहीत.तेव्हा पासून हा सण साजरा करतात.

बैल वर्षभर रातराण दिवस मातीत काबाड कष्टक करणा-या मुक्या प्राण्यांचे बैलाचे सर्व सोपस्कार करायचे, सोहळे पुरवायचे आणि मायेने हात फिरवायचा असा हा सण. या दिवशी बैलाना अंघोळघालून रानमाळातून फिरवून आणतात.बैलांच्या शिंगाना शिंगोटया बसवितात.त्या शिंगावर वर्नीस किंवा हिंगुळ लाऊन त्यावर बेगड पट्ट्या बसवितात. वाखाची किंवा सुताची नवी म्होरकी,नव्या गोंडेदार माताटया,नवा कांडा,नवी वेसण, नवा कासरा,सगळे काही नवे, रंगीत असते.तसेच घाग-या, घुंगुरामाळा,दृष्टमणी बांधले जातात. कपाळावर बाशिंग बांधतात, गोंडे, झुल, पायात चांडीचे तोडे अशा प्रकारे सजवतात.तसेच गायी, म्हशी, वासरे यांनाही सजावले जाते. त्यानंतर सहकुटुंब चांगभले म्हणत प्रदक्षिणा घालतात.सायंकाळी त्यांची मिरवणूक काढली जाते.
              




No comments:

Post a Comment