Wednesday 5 March 2014

दिवाळी




दिवाळी म्हणजे सणांचा राजा. दिपावली म्हणजेच दिव्यांच्या ओळी. भारताचा हा एक महत्वाचा राष्ट्रीय सण आहे. हा सण केवळ एक उत्सव नाही तर सणांचे स्नेहसंमेलन आहे. आश्विन महिन्यातील तीन दिवस आणि कार्तिक महीन्यातील दोन दिवस असे धनत्रयोदशी, नएअकचतुर्दशी, दिवाळी, सुरु होणारे नवे वर्ष आणि भाऊबीज असे पाच उत्सव म्हणजे दिपोत्सव. दिवाळी सणातील पहीला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. याला धनतेरसही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी लोक धनाची म्हणजे लक्ष्मीची पूजा करतात. या वेळी सर्वत्र पणत्या आणि मेणबत्त्या लावलेल्या असतात. त्यातील काही दिव्यांचे तोंड दक्षिणेकडे करुन ठेवण्याची प्रथा आहे. एखाद्या ताम्हणात-वाटीत किंवा पाटावर बंध्या रुपयाची नाणी ठेवून त्याला हळद कुंकु वाहून त्याची पूजा करतात. त्यानंतर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.धनाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, आणि वर्षभर काही कमी पडत नाही असा समज आहे. नरकासुर नावाचा एक राक्षस होता. त्याचा श्रीकृष्णाने वध केला म्हणून त्याची साक्ष म्हणून दिवाळी सणातील दुसरा दिवस साजरा केला जातो. त्याला नरकचतुर्दशी म्हणतात. नरकासुराने अनेक देशातील सोळा हजार कुमारीकांना आपल्या तुरुंगात ठेवले होते. श्रीकृष्णाने त्याचा वध करुन त्या कुमरीकांची सुटका केली. ही घटना आश्विन वद्य चतुर्दशीला झाली म्हणून हा दिवस नरकचतुर्दशी या नावाने ओळखला जातो.


दिवाळीच्या सणातील तिसरा दवस लक्ष्मीपूजनाचा असतो.या दिवशी गणपतीचीही पूजा केली जाते. हा अश्विन महीन्यातला शेवटचा दिवस होय. या दिवशी अमावस्या असते. आणि या दिवशी सायंकाळी लक्ष्मीची पूजा केली जाते.ताटात पैसे, नाणी ठेवून त्याचीच लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. या दिवशी व्यापारी लोक, दुकानदार हे लक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा करतात. दुकानात जामाखर्चाच्या वह्या आणल्या जातात व त्याबरोबरच वजनमापे यांचीही पूजा केली जाते. नैवेद्य दाखवीला जातो. नैवेद्य म्हणून साळीच्या लाह्या व बत्तसे दिले जातात. आणि तोच प्रसाद म्हनून इष्टांना दिला जातो.    

बलिप्रतिपदा हा दिवाळीचा चौथा दिवस कर्तिक शुध्द प्रतिपदेचा हा दिवस होय. विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून याचे विशेष महत्व आहे. याला कहीजण व्यापारी पाडवा असेही म्हणतात. व्यापारी आपले नवे वर्ष या दिवशी सुरु करतात. हा दिवस एकूण वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी गुजराती लोकांमध्ये अन्नकोट करण्याची रीत आहे. अन्नाचे वेगवेगळे ढीग घालून ते श्रीकृष्णाला अर्पण करतात. दिवाळीचा पाचवा आणि शेवटचा म्हणजे, भाऊबीज. भाऊ बहीणीच्या प्रेमाचा मंगल दिवस यालाच यमव्दितीया असेही म्हणतात. या दिवशी बहिण भावाला मंगल स्नान घालते. पाट, रांगोळ्यांचा थाट करते. बहिण भावाला ओवाळते. आणि भऊ बहिणीला एखादी भेट देतो. याच दिवशी यम आपल्या बहिणीला भेटायला तिच्या घरी गेला होता. तिने त्याच्या स्वागतासाठी घरभर दिवे लावलेले पाहून तो तिच्यावर संतुष्ट झाला. त्याने बहिणीला ओवाळणी घातली. 

Saturday 1 March 2014

अक्षय तृतीया


वैशाख शुक्ल तॄतीया म्हणजेच अक्षय तृतीया. अक्षय्य तृतीया या दिवसाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. याच दिवशी कृत युगाचा आरंभ झाल्याने याला युगादि असेही म्हटले जाते. या दिवशी विविध पौराणिक कथांची सांगता होत असून याच दिवशी श्री गणेशांनी ऋषी महर्षि व्यास यांच्या सांगण्यावरून महाकाव्य महाभारत लेखनास प्रारंभ केला.या दिवशी भगवान विष्णू याण्चा सहावा अवतार परशूराम यांचा जन्मोत्सव साजरा केला जतो. या निमित्तने अनेक ठिकाणी परशूराम जयंतीही साजरी केली जाते. महाराष्ट्र स्थित चिपळून पासून जवळच असलेल्या परशूराम क्षेत्री या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो. हिंदू पौराणिक कथेनुसार त्रेता युगाला प्रारंभ होऊन भारतातली पवित्र गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर आली. यावरूनच शास्रात या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे.तसेच या दिवसाचे आणखी एक महत्व म्हणजे कुबेराने भगवान शिवाची प्रार्थना करुन त्यांना प्रसन्न केले आणि देवी लक्ष्मी यांच्या संप्पतीचे संरक्षक म्हणून स्थान प्राप्त करुन घेतले.

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहुर्तापैकी एक शुभमुहर्त मानला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी  या दिवशी पितरांचे स्मरण करुन त्यांच्या प्रतिमेचे पुजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणुन, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंद्ग येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर-आंब्याचे पन्हे, किंवा चिंचोणी, पापड, कुरड्या वाढतात. सुगंधीत पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जतो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो. असे मानले जाते. या दिवशी सुरु केलेल्या कोणत्याही कार्याचे फळ ‘अक्षय्य’(न संपनारे) असे मिळते असा समज आहे.  

पावसाळा सुरु होन्याच्या आधी अक्षय्य तृतीया येते. नांगरलेल्या शेतजमिनीची मशागत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करावे. या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवुन काही शेतकरी पुजन केलेल्या मृत्तिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासुन विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहर्तावर आळी करुन लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहर्तावर रोवल्यास या वनस्पतीचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतीचा तुटवडा भासत नाही, असे म्हटले जाते.

Wednesday 26 February 2014

दसरा(विजयादशमी)




नवरात्री संपल्यानंतर शेवट्चा दिवस म्हणजे दसरा यालाच विजयादशमी असेही म्हणतात. हा दिवस विजयाचा दिवस म्हणुन साजरा केला जातो. व्यक्ती आणि समाज यांच्यात वीरता प्रकटावी यासाठी दस-याचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कामात हमखास यश मिळणार, अशी समजूत आहे.दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो.


हा सण आश्विन शुध्द दशमी हा दिवस आहे.  प्रभु रामचंद्रांच्या वेळेपासूनच हा दिवस साजरा केला जातो. रामचंद्राने रावणावर मात करण्यासाठी हयाच दिवशी प्रस्थान केले होते. तसेच पांडवांचा अज्ञातवास संपला तेव्हा त्यांनी याच दिवशी शमी वृक्षाचे पुजन करून आपली या वृक्षावर लपवीलेली शस्रास्रे पिन्हा घेतली. अशी माहीती महाभारतात मिळते.या दिवशी छत्रपती शिवाजी राजांनी औरंगजेबाला जेरीस आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

या सणाविशयी अनेक कथा आहेत. त्यपैकी एक म्हणजे रघुराजावर सीमोल्लंघनाचा प्रसंग आला होता. त्यावेळ  रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजीत यज्ञ केला. व त्याने सर्व संपत्तीचे दान केले.  आणि  तो एका पर्णकुटीत राहिला. वरतंतुचा शिष्य कौत्स तिथे दक्षिणा मागण्यासाठी आला. त्याला १४ कोटीसुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघुराजालाला वाटले जर कौत्स्न घेता रिकाम्या हाताने गेला तर आपल्या सात पिढ्या लज्जित होतील. हे हौ द्यायचे नाही म्हणुन त्याने कुबेराला युध्दाचे आव्हान दिले. कुबेराने घाबरुन आपटा शमी वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव करतो. त्यातील फक्त  १४ कोटी सुवर्णमुद्रा कौत्स घेवुन जातो. बाकीचे सुवर्ण प्रजाजन नेतात. तेव्हापासुन या वृक्षाने वैभव दिले म्ह्णुन याचे पुजन केले जाते.

दसरा शेतकर्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण नवरात्रात नऊ दिवसात उगवलेली रोपे शेवटच्या दिवशी दस-यास वाहतात. तसेच शेतकरीही शेतात तयार झालेल्या भाताच्या लोंब्या आणून त्याची पूजा करतात. प्रवेशद्वारावरही टांगतात. याशिवाय घरातील विविध भांड्यांना धान्याची कणसे बांधण्याची प्रथा कोकणात आहे. बंगालमध्येही अशाच प्रकारचा एक विधी होतो. तेथे स्त्रिया गवताची पेंढी धान्याच्या कोठारास बांधतात. त्याला बावन्न पोटी असे म्हणतात. म्हणजे हे धान्य बावन्न पट होऊ दे.

Tuesday 18 February 2014

गोकुळ अष्ट्मी

                                                                                                                       


श्रावण वद्य अष्टमीचा दिवस हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस होय. तोच दिवस गोकुळ अष्टमी म्हणून साजरा करतात. श्रीकृष्ण हा विष्णूचाच अवतार श्रीकृष्ण किंवा विष्णूच्या मंदिरात हा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. हीच श्रीकृष्ण जयंती होय. श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाला म्हणून त्याला गोकुळ अष्टमी असे म्हणतात. श्रीकृष्ण श्रावण वद्य अष्टमीस तुरूंगाच्या कोठडीत जन्मास आले, अशी कथा प्राचीन ग्रंथांत आहे.

मथुरेचा राजा उग्रसेन त्याचा मुलगा कंस याने तुरुंगात टाकले. आणि त्याचे राज्य हस्तगत केले. आपल्या चैनीसाठी कंसाने प्रजेवर अन्याय-अत्याचार केले. त्याच्या बहीणीचे लग्न झाले. वरातीचा रथ वसुदेवाच्या घरी जात असताना आकाशवाणी झाली की, ‘दुष्ट कंस, ज्या बहीणीला तू मोठ्या प्रेमाने सासरी पाठवत आहेस, तिचा आठवा पुत्र तुझा वध करणार आहे.’ हे ऐकून कंस देवकीला माराण्यासाठी गेला पण वसुदेवाने त्याची समजूत घातली आणि त्याने वचन दिले की, देवकीला होणारी मुले मी तुझ्या स्वधीन करेल.त्यमुळे त्यांना कारागृहात टाकले. त्या दोघांवर सक्त पहारा ठेवला. देवकीची सात मुले कंसाने मारली होती. श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. बंदीशाळेतील सर्व पहारेकरी झोपले असताना वसुदेव त्या बाळाला यमुना नदी ओलांडून नंदाच्या घरी गेले. ते बाळ नंदाच्या घरी ठेवले आणि यशोदेच्या मुलीला घेऊन परत कारागृहात आले.


हा जन्मोत्सव श्रावण वद्य प्रतिपदा ते अष्टमी असा आठ दिवस असतो. काही ठिकाणी पाच दिवस, तर काही ठिकाणी तीन दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन असे कार्यक्रम आयोजेत केले जातात. या दिवशी उपवास करतात. अष्तमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून मंदिरात छोटा पाळणा बांधून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवतात. पाळण्यास झोके देउन भजन, गाणी गायली जातात. या दिवशी संध्याकाळी दहीहंडीचा कार्यक्रम केला जातो. मातीच्या एका मोठ्या मडक्यात दूध, दही, ताक, लाह्या, पोहे अशा पादार्थांचे कालवण करून भरतात. तो घट उंच जागी टांगून ठेवला जातो. आणि तरूण आणि आता तरूणीही एकमेकांच्या खांद्यावर चढून ती दहीहंडी फोडतात. त्या फुटलेल्या दहीहंडीचा तुकडा घरात टाकला की उंदीर होत नाहीत अशी समजूत आहे.

भारतात गोकुळ, मथुरा, वृंदावन, व्दारकाया ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट इथे हा सण साजरा केला जातो.