दिवाळी
म्हणजे सणांचा राजा. दिपावली म्हणजेच दिव्यांच्या ओळी. भारताचा हा एक महत्वाचा
राष्ट्रीय सण आहे. हा सण केवळ एक उत्सव नाही तर सणांचे स्नेहसंमेलन आहे.
आश्विन महिन्यातील तीन दिवस आणि कार्तिक महीन्यातील दोन दिवस असे धनत्रयोदशी,
नएअकचतुर्दशी, दिवाळी, सुरु होणारे नवे वर्ष आणि भाऊबीज असे पाच
उत्सव म्हणजे दिपोत्सव. दिवाळी
सणातील पहीला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. याला धनतेरसही म्हणतात. या
दिवशी संध्याकाळी लोक धनाची म्हणजे लक्ष्मीची पूजा करतात. या वेळी सर्वत्र पणत्या
आणि मेणबत्त्या लावलेल्या असतात. त्यातील काही दिव्यांचे तोंड दक्षिणेकडे करुन
ठेवण्याची प्रथा आहे. एखाद्या ताम्हणात-वाटीत किंवा पाटावर बंध्या रुपयाची नाणी
ठेवून त्याला हळद कुंकु वाहून त्याची पूजा करतात. त्यानंतर गोड पदार्थांचा नैवेद्य
दाखवला जातो.धनाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, आणि वर्षभर काही कमी पडत
नाही असा समज आहे. नरकासुर
नावाचा एक राक्षस होता. त्याचा श्रीकृष्णाने वध केला म्हणून त्याची साक्ष म्हणून
दिवाळी सणातील दुसरा दिवस साजरा केला जातो. त्याला नरकचतुर्दशी म्हणतात.
नरकासुराने अनेक देशातील सोळा हजार कुमारीकांना आपल्या तुरुंगात ठेवले होते.
श्रीकृष्णाने त्याचा वध करुन त्या कुमरीकांची सुटका केली. ही घटना आश्विन वद्य
चतुर्दशीला झाली म्हणून हा दिवस नरकचतुर्दशी या नावाने ओळखला जातो.
दिवाळीच्या
सणातील तिसरा दवस लक्ष्मीपूजनाचा असतो.या दिवशी गणपतीचीही पूजा केली जाते. हा अश्विन महीन्यातला शेवटचा
दिवस होय. या दिवशी अमावस्या असते. आणि या दिवशी सायंकाळी लक्ष्मीची पूजा
केली जाते.ताटात पैसे, नाणी ठेवून त्याचीच लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. या दिवशी
व्यापारी लोक, दुकानदार हे लक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा करतात. दुकानात जामाखर्चाच्या
वह्या आणल्या जातात व त्याबरोबरच वजनमापे यांचीही पूजा केली जाते. नैवेद्य
दाखवीला जातो. नैवेद्य म्हणून साळीच्या लाह्या व बत्तसे दिले जातात. आणि तोच
प्रसाद म्हनून इष्टांना दिला जातो.
बलिप्रतिपदा हा दिवाळीचा चौथा दिवस कर्तिक शुध्द प्रतिपदेचा हा दिवस होय. विक्रम संवत्सराचा
पहिला दिवस म्हणून याचे विशेष महत्व आहे. याला कहीजण व्यापारी पाडवा
असेही म्हणतात. व्यापारी आपले नवे वर्ष या दिवशी सुरु करतात. हा दिवस एकूण
वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी गुजराती लोकांमध्ये अन्नकोट
करण्याची रीत आहे. अन्नाचे वेगवेगळे ढीग घालून ते श्रीकृष्णाला अर्पण करतात.
दिवाळीचा पाचवा आणि शेवटचा म्हणजे, भाऊबीज. भाऊ बहीणीच्या प्रेमाचा मंगल
दिवस यालाच यमव्दितीया असेही म्हणतात. या दिवशी बहिण भावाला मंगल स्नान
घालते. पाट, रांगोळ्यांचा थाट करते. बहिण भावाला ओवाळते. आणि भऊ बहिणीला
एखादी भेट देतो. याच दिवशी यम आपल्या बहिणीला भेटायला तिच्या घरी गेला
होता. तिने त्याच्या स्वागतासाठी घरभर दिवे लावलेले पाहून तो तिच्यावर संतुष्ट झाला.
त्याने बहिणीला ओवाळणी घातली.
No comments:
Post a Comment