Saturday, 1 March 2014

अक्षय तृतीया


वैशाख शुक्ल तॄतीया म्हणजेच अक्षय तृतीया. अक्षय्य तृतीया या दिवसाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. याच दिवशी कृत युगाचा आरंभ झाल्याने याला युगादि असेही म्हटले जाते. या दिवशी विविध पौराणिक कथांची सांगता होत असून याच दिवशी श्री गणेशांनी ऋषी महर्षि व्यास यांच्या सांगण्यावरून महाकाव्य महाभारत लेखनास प्रारंभ केला.या दिवशी भगवान विष्णू याण्चा सहावा अवतार परशूराम यांचा जन्मोत्सव साजरा केला जतो. या निमित्तने अनेक ठिकाणी परशूराम जयंतीही साजरी केली जाते. महाराष्ट्र स्थित चिपळून पासून जवळच असलेल्या परशूराम क्षेत्री या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो. हिंदू पौराणिक कथेनुसार त्रेता युगाला प्रारंभ होऊन भारतातली पवित्र गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर आली. यावरूनच शास्रात या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे.तसेच या दिवसाचे आणखी एक महत्व म्हणजे कुबेराने भगवान शिवाची प्रार्थना करुन त्यांना प्रसन्न केले आणि देवी लक्ष्मी यांच्या संप्पतीचे संरक्षक म्हणून स्थान प्राप्त करुन घेतले.

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहुर्तापैकी एक शुभमुहर्त मानला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी  या दिवशी पितरांचे स्मरण करुन त्यांच्या प्रतिमेचे पुजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणुन, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंद्ग येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर-आंब्याचे पन्हे, किंवा चिंचोणी, पापड, कुरड्या वाढतात. सुगंधीत पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जतो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो. असे मानले जाते. या दिवशी सुरु केलेल्या कोणत्याही कार्याचे फळ ‘अक्षय्य’(न संपनारे) असे मिळते असा समज आहे.  

पावसाळा सुरु होन्याच्या आधी अक्षय्य तृतीया येते. नांगरलेल्या शेतजमिनीची मशागत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करावे. या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवुन काही शेतकरी पुजन केलेल्या मृत्तिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासुन विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहर्तावर आळी करुन लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहर्तावर रोवल्यास या वनस्पतीचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतीचा तुटवडा भासत नाही, असे म्हटले जाते.

No comments:

Post a Comment